मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील सुमारे 42 लाख प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेवर नवीन वेळापत्रक अंमलात आणलं जाणार आहे. वेळापत्रकानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिव्यातील प्रवाशांसाठी आणखी दहा फास्ट लोकल फेऱ्यांची भेट मिळणार आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सहार्बर प्रवाशांनाही दहा वाढीव फेऱ्यांचं गिफ्ट मिळणार आहे.

नव्या वेळापत्रकात मेन लाइनवरील कमी अंतरांच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेवर एका दिवसात 1658 लोकल फेऱ्या होतात. यापैकी 836 फेऱ्या मध्य रेल्वेवर, तर हार्बरवर 590 आणि ट्रान्सहार्बरवर 232 फेऱ्या होतात.

मध्य रेल्वेवरील फेऱ्यांची कमाल क्षमता झाल्याने कमी अंतराच्या फेऱ्यांचा विस्तार करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटी ते कुर्ला यासारख्या कमी अंतरांच्या फेऱ्यांचा विस्तार होण्याची चिन्हं आहेत.

फास्ट लोकलना दिवा रेल्वे स्थानकावर थांबा दिल्याने गेल्या अनेक वर्षांची दिवावासियांची मागणी पूर्ण झाली आहे. 18 डिसेंबर 2016 पासून दिवा स्टेशनवरही फास्ट लोकलचा थांबा सुरु करण्यात आला. दिवा रेल्वे स्थानकावर 12 अप आणि 12 डाऊन फास्ट लोकलना थांबा देण्यात आला होता.

दिवा रेल्वे स्थानकावर सध्या 'या' 12 डाऊन फास्ट लोकलना थांबा :

  1. सीएसटी – कर्जत लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 6.10 वा.

दिवा स्थानक – सकाळी 6.57 वा.

  1. सीएसटी – खोपोली लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 7.53 वा.

दिवा स्थानक – सकाळी 8.40 वा.

  1. सीएसटी – कर्जत लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 8.29 वा.

दिवा स्थानक – सकाळी 9.16 वा.

  1. सीएसटी – बदलापूर लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.15 वा.

दिवा स्थानक – सकाळी 10.2 वा.

  1. सीएसटी – कसारा लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.42 वा.

दिवा स्थानक – सकाळी 10.29 वा.

  1. सीएसटी – कसारा लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 10.20 वा.

दिवा स्थानक – सकाळी 11.7 वा.

  1. सीएसटी – अंबरनाथ लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – दुपारी 11.22 वा.

दिवा स्थानक – दुपारी 12.9 वा.

  1. सीएसटी – कर्जत लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.15 वा.

दिवा स्थानक – दुपारी 2.2 वा. 


  1. सीएसटी – आसनगाव लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.18 वा.

दिवा स्थानक – संध्याकाळी 6.8 वा.

  1. सीएसटी – टिटवाळा लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.59 वा.

दिवा स्थानक – संध्याकाळी 18.47 वा.

  1. सीएसटी – कर्जत लोकल


सीएसटी – संध्याकाळी 6.21 वा.

दिवा स्थानक – संध्याकाळ 19.9 वा.

  1. सीएसटी – खोपोली लोकल


सीएसटीहून सुटण्याची वेळ – रात्री 8.48 वा.

दिवा स्थानक – रात्री 9.36 वा.

दिवा रेल्वे स्थानकावर सध्या 'या' 12 अप फास्ट लोकलना थांबा :

  1. कर्जत – सीएसटी लोकल


कर्जतहून सुटण्याची वेळ – सकाळी 5.53 वा.

दिवा स्थानक – सकाळी 6.55 वा.

  1. कसारा – सीएसटी लोकल


कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – सकाळी 6.43 वा.

दिवा स्थानक – सकाळी 8.8 वा.

  1. अंबरनाथ – सीएसटी लोकल


अंबरनाथहून सुटण्याची वेळ – सकाळी 8.45 वा.

दिवा स्थानक – सकाळी 9.9 वा.

  1. खोपोली – सीएसटी लोकल


खोपोलीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.19 वा.

दिवा स्थनक – सकाळी 10.50 वा.

  1. कसारा – सीएसटी लोकल


कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – सकाळी 10.10 वा.

सीएसटी स्थानक – सकाळी 11.34 वा.

  1. कर्जत – सीएसटी लोकल


कर्जतहून सुटण्याची वेळ – दुपारी 12.1 वा.

दिवा स्थानक – दुपारी 1.4 वा.

  1. बदलापूर – सीएसटी लोकल


बदलापूरहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.22 वा.

दिवा स्थानक – 1.53 वा.

  1. कसारा – सीएसटी लोकल


कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.32 वा.

दिवा स्थानक – दुपारी 2.56 वा.

  1. कसारा – सीएसटी लोकल


कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – दुपारी 3.37 वा.

दिवा स्थानक – संध्याकाळी 5.1 वा.

  1. बदलापूर – सीएसटी लोकल


बदलापूरहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.4 वा.

दिवा स्थानक – संध्याकाळी 5.36 वा.

  1. टिटवाळा – सीएसटी लोकल


टिटवाळ्याहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 6.21 वा.

दिवा स्थानक – संध्याकाळी 6.49 वा.

  1. कर्जत – सीएसटी लोकल


कर्जतहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 18.42 वा.

दिवा स्थानक – संध्याकाळी 7.45 वा.