मुंबईत 1 कोटीच्या जुन्या नोटा जप्त, पाच जण अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 17 Mar 2017 11:24 PM (IST)
मुंबई: जुन्या नोटा बंद होऊन चार महिने उलटले आहेत. मात्र, अजूनही जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटांची हेराफेरी सुरूच आहे. राज्यातल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 1 कोटी 60 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईतल्या मुलुंडमध्ये 1 कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे पुण्याजवळील लोणावळ्यात पोलिसांनी 60 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. 30 टक्के कमिशन देऊन या नोटा बदलल्या जाणार होत्या अशी माहिती मिळते आहे. लोणावळा पोलिसांनी 4 लोकांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अजूनही काही ठिकाणी जुन्या सापडण्याच्या घटना उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातून 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.