Mumbai Rains Local Trains Update: मुंबईसह लगतच्या परिसरात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार बघायला मिळत आहे. दरम्यान आज देखील मुंबईवर पावसाचे ढग अधिक गडद राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी आज (20 ऑगस्ट2025) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. परिणामी आज देखील मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर संभाव्य धोका लक्ष्यात घेता मुंबई विद्यापीठाच्या आज (20 ऑगस्ट2025) होणाऱ्या सर्व परीक्षा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात लवकरच नवं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे, या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर देखील पडला आहे. आज अनेक मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो घरातून बाहेर पडताना पावसाच्या संदर्भातील सर्व माहिती घेऊनच घरा बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीतच, 'या' ट्रेन रद्द
1) NSP 90012 - 03:40 नाला सोपारा ते बोरिवली
2) BO 90014 - 04:15 बोरिवली ते चर्चगेट
3) VR 92002 - 04:00 विरार ते दादर
4) VR 92009 05:15 दादर ते विरार
5) NSP 90046 04:35 - नाला सोपारा ते चर्चगेट
6) VR 92004 04:50- विरार ते चर्चगेट
7) VR ९२०२१ 06:25- चर्चगेट ते विरार
8) NSP 92006 05:05 नाला सोपारा ते अंधेरी
9) VR 92013 06:05 अंधेरी ते विरार
10) NSP 92010 05:24 नाला सोपारा- अंधेरी
11) NSP 92019 06:49 अंधेरी ते भाईंदर
12) NSP 92022 06:33 - नाला सोपारा- अंधेरी
13) NSP 92033 07:41- अंधेरी- विरार
14) बीओ 90008- 04:05 बोरिवली ते चर्चगेट
15) BO 90010 04:10 - बोरिवली ते चर्चगेट
16) बीओ 90015 04:18 चर्चगेट ते बोरिवली
17) BO 90060 05:31 बोरिवली ते चर्चगेट
मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेची लोकल सेवा पूर्ववत
दरम्यान, मुंबईतील काल (19 ऑगस्ट) मोने रेल तांत्रिक बिघाडामुळं भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान मध्येच अडकली होती. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं बचाव कार्य सुरु करण्यात आलं. साधारणपणे पावणे दोन तासानंतर प्रवाशांची सुटका करण्यात यश आलं. तर काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा लोकल सेवा पूर्ववत झाल्याचा पाहायला मिळतय. मध्य रेल्वेची लोकल सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने पाहायला मिळतेय. तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर लोकल सेवा सुद्धा दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरू आहे.
तर पश्चिम रेल्वे लाईन वरची लोकल सेवा ते पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे वरील सकाळचे सत्रातील काही लोकल रद्द करण्यात आल्या असल्या तरी उर्वरित लोकल सेवा मात्र सुरळीत सुरू आहे.
संबंधित बातमी: