Mumbai Rain : राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने (Monsoon) धडाकेबाज एन्ट्री कर एकच दाणादाण उडवली आहे. या पावसानं मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत केलं आहे. तर आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात आज (सोमवार, 26 मे) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. रात्री धुवाधार सरी कोसळून गेल्यानंतर पुन्हा पहाटे पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील 3 तासांत मुंबई आणि उपनगरीय भागात मध्यम पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. यासह पुढील 3 तासांत 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत मुंबईत झालेल्या पावसाची माहिती:
नरिमन पॉइंट अग्निशमन स्टेशन - 40 मिमी
नेत्र रुग्णालय ग्रँट रोड -36 मिमी
मेमनवाडा अग्निशमन स्टेशन, सी वॉर्ड ऑफिस -35 मिमी
कोलोबा अग्निशमन स्टेशन -31 मिमी
बी वॉर्ड ऑफिस -30 मिमी
मांडवी अग्निशमन स्टेशन -24 मिमी
भायखळा अग्निशमन स्टेशन -21 मिमी
ब्रिटानिया स्ट्रॉम वॉटर -18 मिमी
नायर रुग्णालय -14 मिमी
मुंबईत 25 ते 26 मे पर्यंत झालेला पाऊस
कुलाबा 71.9 मिमी
सांताक्रूझ17.5 मिमी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, आज ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनने रात्रभर झोडपून काढले आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. आज(26 मे) जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काल सिंधुदुर्गात वेळेआधी १२ दिवस आधी दाखल झाल्याने बळीराजाची चिंता मिटली असून आता शेतीच्या कामांना सुरुवात होणार आहे. सध्या जिल्ह्यात पावसाची सततधार असून मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देऊनही काही मच्छीमार मासेमारीसाठी आपल्या जीवावर उद्गार होऊन समुद्रात मासेमारीसाठी गेल्याचे दिसत आहे.
Monsoon In Kokan Maharashtra : मान्सून तळकोकणात दाखल
महाराष्ट्रातील सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकताच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (Monsoon) अखेर काल (25 मे) महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अधिकृत याची घोषणा करण्यात आली आहे. साधारणपणे महाराष्ट्रात 7 जून रोजी मान्सून दाखल होत असतो, मात्र, यावर्षी 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) ही आनंदाची बातमी आहे.
हे ही वाचा