Mira Bhayandar : मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार आणि स्थानिक राजकारणातील प्रभावशाली नेते गिल्बर्ट जॉन मेंडोसा (Gilbert John Mendonca) यांचे दुर्दैवी निधन झालंय. त्यांच्या निधनाने मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात (Mira Bhayandar Assembly Constituency) शोककळा पसरली आहे. गिल्बर्ट मेंडोसा यांनी स्थानिक राजकारणात चार दशकांपेक्षा जास्त काळ महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. सरपंचापासून आमदारकीपर्यंतचा (Gilbert John Mendonca Passed Away) प्रवास करताना त्यांनी अनेक संघर्ष आणि वादांना सामोरे गेले. त्यांच्या निधनामुळे मिरा-भाईंदरच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला आहे. मिरा भाईंदरमध्ये (Mira Bhayandar) त्यांनी 'सेठ' म्हणून संबोधलं जायचं. मात्र काल 18 ऑगस्ट 2025 रोजी त्यांची प्राणज्योत मावळलीय.
सरपंचापासून आमदारकीपर्यंतचा प्रवास
-गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांनी 1978 मध्ये भाईंदरचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.
-त्यांनतर त्यांनी 1990 मध्ये मिरा-भाईंदर नगरपरिषदेचे अध्यक्षपद भूषवले.
-2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत मिरा-भाईंदरचे ते पहिले आमदार बनले.
-मिरा रोड स्थानकावरून लोकल सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
-2014 च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला समोर जावं लागलं
वाद व संघर्ष
-2016 मध्ये जमीन हडप प्रकरणी अटक, जवळपास नऊ महिने तुरुंगवास भोगला.
-2017 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकांत सक्रिय सहभाग घेतला.
कौटुंबिक वारसा
-पत्नी मायरा मेंडोसा मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर होत्या
-मुलगी कैटलीन पेरेरा हिने 2012–2017 या काळात महापौरपद भूषवले.
-मुलगा वेंचर मेंडोसा नगरसेवक म्हणून कार्यरत होता.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडून श्रांद्धांजली अर्पण
मिरा भाईंदर शहराचे प्रथम आमदार, स्व. गिल्बर्ट मेंडोसा यांचे दुःखद निधन ही अतिशय वेदनादायक घटना आहे. त्यांच्या निधनाने मिरा भाईंदरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक सशक्त व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे कार्य, लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि समाजासाठीची त्यांची अखंड झटणारी वृत्ती सदैव स्मरणात राहील. त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्याला प्रेरणा देतील. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असून ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. अशा शब्दात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रांद्धांजली अर्पण केलीय.