Mumbai Local Mega Block: मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा  रविवारी (8 जून) काहीसा अडथळ्यांचा ठरणार आहे. कारण आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही विलंबाने धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

अनेक लोकल फेऱ्या रद्द, काही विलंबाने

पुढे आलेल्या  माहितीनुसार,  मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे दरम्यान सकाळी 8  ते 1.30  पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे, तर जलद मार्गावर लोकल वळवणार असून 15 मेल-एक्स्प्रेसवर ही या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. सोबतच पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 दरम्यान ब्लॉक असून सीएसएमटी-पनवेल आणि ठाणे-पनवेल लोकल रद्द करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 दारम्यान ब्लॉक असणार आहे. शिवाय काही लोकल दादर/वांद्रेपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांनी प्रवासाच्या आधी वेळा तपासूनच स्टेशनवर गर्दी टाळावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले असून काही विशेष फेर्‍या देखील सुरू करण्यात आली आहे. 

प्रवाशांना अंशतः दिलासा, विशेष गाड्या चालवल्या जातील

दरम्यान, प्रवाशांना अंशतः दिलासा देण्यासाठी सीएसएमटी ते वाशी, ठाणे आणि वाशी/नेरूळ आणि बेलापूर/नेरूळ ते उरण दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 10.30 ते दुपारी 3. 35 वाजेपर्यंत सुरू राहील. या काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

Continues below advertisement

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व स्लो मार्गावरील गाड्या जलद मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या आणि विरारकडे जाणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द राहतील आणि चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे/दादर येथून शॉर्ट टर्मिनेट/रिव्हर्स केल्या जातील. यासंबंधीची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टरच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

इतर महत्वाच्या बातम्या