Marathi vs Non-Marathi Row Sparks Again In Mumbai:महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठीचा वाद पुन्हा एकदा उफाळलेला आहे. मुंबईतील मराठी अमराठीच्या वादामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी उठण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाचा मुजोरपणा समोर आला आहे. एका मराठी तरूणाला मारहाण करत त्यानं जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं' असं म्हणत त्यानं मराठी तरूणाला मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे.  या प्रकरणात सुशील रहेजाविरोधात गोंवडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मु्ंबईत पुन्हा एकदा मराठी अमराठीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यानं एका मराठी तरूणाला क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हा  रहेजाच्या डॉ सी जी गिडवाणी रोड, रहेजा होम्स, चेंबूर येथील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी कार्यालयीन मीटिंग होती. तक्रारदार व्यक्तीला कागदपत्रे जोडून स्टॅपल लावण्याचं काम सांगण्यात आलं होतं. दरम्यान, हे काम करत असताना तक्रादार व्यक्तीकडून क्षुल्लक चूक झाली असल्याची माहिती आहे. कागदपत्रावर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजानं शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.  त्यानं मराठी तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केली.

Continues below advertisement

सुशील रहेजाने तक्रादार व्यक्तीला 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं' असं म्हणत मारहाण केली असा आरोप आहे. तक्रारदार एका विशिष्ट समाजाचा असल्याने त्याला पुन्हा नोकरीवर राहता येऊ नये, असे वर्तन कार्यालयात ठेवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या घटनेनंतर तक्रारदार व्यक्तीने थेट गोवंडी पोलीस ठाणे गाठले. तसेच सुशील रहेजा याच्यावरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गोवंडी पोलिसांनी रहेजाविरोधात कलम ११५ बीएनएस २०२३सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर पोलीस नेमकं काय पाऊल उचलतील, सुशील रहेजाविरोधात काय कारवाई करण्यात येईल,  हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'डॉन म्हणतायेत मला डॉन' प्रभू शेळकेनं दाखवले त्याचे खरे रंग; विशालसोबत झाली शा‍ब्दिक चकमक, बिग बॉसचा नवा प्रोमो व्हायरल