Vishal Kotian And Prabhu Shelke argument: बिग बॉस मराठी सिझन 6ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत 2 स्पर्धकांना नारळ देण्यात आला आहे. स्पर्धकांचे विविध रंग आता समोर येत आहेत. काही स्पर्धकांची शाब्दिक चकमक होत आहे. तर, काहींचे टास्क खेळताना बाचाबाची होत आहे. दरम्यान, चुकीचं वागत असलेल्या स्पर्धकांना रितेश देशमुख चांगलंच धारेवर धरत आहेत. काही दिवसांपासून विशाल कोटियन आणि प्रभू शेळके यांच्यातील शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. एका टास्कमध्ये प्रभूने विशाल नावाचं मडकं, जोरात पाण्यात फेकलं होतं. त्यानंतर विशाल प्रभूला म्हणाला, 'प्रत्येक नॉमिनेशनमध्ये मी तुला नॉमिनेट करेन'. मात्र, यानंतर विशालने प्रभूची माफी मागितली. यानंतर रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर प्रभूला चांगलंच धारेवर धरलं. 'तुम्ही खूप लाडात आलाय', असं म्हणत रितेशने त्याला झापलं.
अशातच कलर्स मराठीने अलिकडेच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये विशाल आणि प्रभू यांच्यात शाब्दिक चकमक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये विशाल प्रभूला म्हणतो, 'तू माझ्यासाठी इतका महत्वाचा नाही आहेस', त्यावर प्रभू, ' तुम्हाला घमंड आला आहे. बॉडी असूनही उपयोग नाही' असं म्हणतो. तेव्हा विशाल, 'तू नॉमिनेटेड आहे, मला तुला फुटेज नाही द्यायचं तू जा..'असं प्रभूला म्हणतो. 'डॉन म्हणतायेत मला डॉन. मला हलक्यात घ्यायचं नाही हं. दुसऱ्याची वाट लावून मी बाहेर जाणार', असं प्रभू विशालला आकांडतांडव करत म्हणतो. दोघांचाही आवाजही यावेळेस वाढतो.
दोघांच्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडिओतून दोघांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने बिग बॉसचा हा प्रोमो समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये 'डॉन अन् विशालच्या भांडणामुळे फूल फायरी झालंय, बिग बॉस घरातील वातावरण...' नंतर 3 इमोजी शेअर केले आहे. असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. दरम्यान, विशाल आणि प्रभू यांच्यातील वाद टोकाला जाणार का? असा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
बिग बॉस मराठीच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट केलं आहे. काहींनी विशालची बाजू घेतली आहे. तर, काहींनी छोटा डॉन प्रभू शेळकेची बाजू घेतली. एकाने 'हा छोटा डॉन आणि रोशन संधी मिळाली की सिम्पथी घेतात', असं म्हटलं आहे. सध्या प्रोमो पाहून काहींनी एपिसोड पाहण्याची उत्सुकता दर्शवली.
