Udayanraje Bhosale : सरकार काय बोळ्याने दूध पितं का? शिवाजी महाराजांच्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर

Udayanraje Bhosale पुणे : शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी सरकारवर सडकून (Maharashtra Goverment) टीका केली आहे.

Continues below advertisement

Udayanraje Bhosale पुणे : शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी सरकारवर सडकून (Maharashtra Goverment) टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) सातत्याने अवमान होतो, त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे. असे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्याने दूध पिताय का? असा संतप्त सवाल करत खासदार उदयनराजेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 

Continues below advertisement

पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 336वी पुण्यतिथी साजरी केली जाते आहे. त्यासाठी उदयनराजे वढू बुद्रुक येथे आले होते आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केलं. यावेळी बोलताना सातत्याने होणाऱ्या महापुरुषांच्या अपमानकार वक्तव्यावर त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

महापुरुषांचा अपमान व्हावा, अस सर्व लोकप्रतिनिधींना वाटतं का?

राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोललं जातंय. या संदर्भात शासनाने कठोर कायदा करत मकोको प्रमाणे कायदा आणावा. त्यात अजामीन पात्र शिक्षा आणि किमान दहा वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे. आता पर्यंत अनेक अधिवेशन झाले, अलिकडे अधिवेशन पार पडलं. यात का कायदा करण्यात आला नाही? महापुरुषांचा अपमान व्हावा, अस सर्व लोकप्रतिनिधींना वाटतं का? असा सवाल देखील खासदार उदयनराजेंनी यावेळी विचारला आहे. 

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यावर 10 वर्षांची शिक्षा व्हावी- खासदार उदयनराजे 

नुकतेच खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यशासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करुन, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिध्द करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती,  त्याला जसे समजले, वाटते आहे  अश्या पध्दतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण विवाद निर्माण करतो. अश्या प्रवृत्तींमुळे समाजामध्ये दुही पसरतेच परंतु राज्यातील देशातील कायदा आणि सुव्यवस्था देखिल बिघडते. शेजारी  राहणा-यांची मने कुलूषित होतात आणि त्याचे दिर्घ परिणाम समाजाला भोगावे लागतात ही वस्तुस्थिती आहे.

आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करावा त्याचबरोबरीने अश्या प्रवृत्तींचेबाबतीत कायदेशीर कारवाई करता येणारा तसेच ,  किमान 10 वर्षाची शिक्षा असणारा अजामिनपात्र विशेष कायदा पारित करावा. अशी मागणी करत खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन ही दिलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola