Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Review: चित्रपटाचे तीन प्रकार आहेत, चांगले चित्रपट, वाईट चित्रपट आणि सलमान खान (Salman Khan) चे चित्रपट. असा हा तिसऱ्या प्रकारातला चित्रपट आहे. चित्रपटाने काही फरक पडतच नाही. चाहते तर त्याचे चित्रपट पाहणारच, पण तरीही चित्रपटाचा रिव्ह्यू (Review) पाहूया.

कथा

सलमानचा चित्रपट आहे तर स्टोरीची गरज नाहीच. पण तरीही असा प्रश्न विचारला गेला की, चित्रपटाची स्टोरी काय आहे? तर ही गोष्ट आहे भाईजानची म्हणजेच सलमान खानची. जो आपले तीन भाऊ राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांना वाढवण्यासाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी लग्न करत नाही. आता या तिन्ही भावांना गर्लफ्रेंड आहे. ज्याची भूमिका शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांनी साकारली आहे. आता या तिघांच्या लग्नाआधी भाईजानचे लग्न होणे गरजेचे आहे. अशातच पूजा हेगडे भाईजानच्या आयुष्यात प्रवेश करते आणि कथा पुढे सरकते. होय तुम्ही बरोबर वाचले. पुढची कथा समजून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावे लागेल.

कसा आहे चित्रपट?

हा एक टिपिकल सलमान खानच्या टाईपटचा चित्रपट आहे, ज्यामध्ये सलमान अॅक्शन, रोमान्स करतो. सलमान खान चित्रपटात सर्वकाही करतो, ज्यासाठी तो ओळखला जातो आणि जे तो  वर्षानुवर्षे करत आहे. चित्रपटातील एका दृश्यात पूजा सलमानला म्हणते की, जर तुला रागच काढावा लागला तर तू कसा काढशील? सलमान एक्सप्रेशन देतो, मग ती म्हणते की तुला रोमान्स करायचा असेल तर कसा करशील? संपूर्ण दृश्यात सलमान खान एकच एक्सप्रेशन देताना दिसतो. सलमान स्वतः म्हणतो की मी त्याच एक्सप्रेशन फॉलो करत आलो आहे आणि प्रेक्षकांना मला हे सर्व करताना बघायचे आहे आणि त्याप्रमाणे सलमानने तेच केले आहे.

चित्रपटातील अॅक्शन अनेक ठिकाणी बालिश वाटत आहेत. चित्रपट पाहताना हे का होतंय आणि कशासाठी होतंय? असा प्रश्न पडेल. फक्त आणि फक्त सलमान खानलाच पाहायचं असेल तर हा चित्रपट योग्य आहे. चित्रपटाच्या शेवटी सलमान शर्टही काढतो आणि त्यावेळी सलमानच्या चाहत्यांचे पैसे पूर्णपणे वसूल होतात. मात्र चित्रपट पाहताना डोकं घरी ठेवा. चित्रपटात एक सरप्राईजही आहे जे चित्रपटगृहात गेल्यावर कळेल.

अभिनय

सलमान खानने तसाच अभिनय केला आहे जसा तो करतो आणि प्रेक्षकांना तो तसाच आवडतो हेही खरे आहे. असो, सुपरस्टार तोच आहे जो वाईट चित्रपटही चालवू शकतो आणि सलमानकडे ती ताकद आहे. मात्र, याचा अर्थ हा चित्रपट वाईट आहे असे नाही. पूजा हेगडेचा अभिनयही तसाच आहे जो आपण पाहिला आहे. या चित्रपटात शहनाज गिलचे पदार्पण आहे आणि तिचे चाहते तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. शहनाज खूप क्यूट आहे. चित्रापटातील तिचे पात्र हे तिच्याप्रमाणे तिला अनुसरुन आणि साजेसेच देण्यात आले आहे. ती जशी आहे तशीच चित्रपटात वागते. चित्रपटातील एक-दोन कॉमेडी पंच चांगले आहेत. पलक तिवारीचा अभिनयदेखील बरा आहे, पण तिला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. राघव जुयालची चित्रपटातील कामगिरी चांगली आहे. जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम देखील ठीक आहेत. सलमानच्या चित्रपटाची अडचण अशी आहे की तुम्हाला सलमानशिवाय कोणी दिसत नाही. हीच समस्या या चित्रपटाचीही आहे. होय, यात सतीश कौशिक देखील दिसत आहे आणि त्याला चित्रपटात पाहून थोडे बरे वाटते.

डायरेक्शन

हा चित्रपट पाहून अक्षय कुमारचे चाहते फरहाद सामजीला 'हेरा फेरी 3'मधून काढून टाकण्याची मागणी का करत आहेत, हे समजते.

संगीत

रवी बसरूरचे संगीत आणि गाणी ऐकायला आवडतीलच असे नाही. या चित्रपटात गाणी पुन्हा पुन्हा येतात जी आधीच त्रासलेल्या प्रेक्षकांना आणखी अस्वस्थ करतात.

रेटिंग - 5 पैकी 2.5 स्टार (सलमान आणि शहनाजसाठी अर्धे)

संबंधित बातम्या:

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज!