Jalgaon Sushama Andhare : सत्ता हातात असल्याने गुलाबराव पाटलांना (Gulabrao Patil) कैफ चढला आहे, इथली पोलीस यंत्रणा, मिलिटरी, एसआरपीएफ ज्या काही पोलीस यंत्रणा उपस्थित आहेत, त्या सगळ्या यंत्रणा गुलाबराव पाटील यांनी घ्याव्यात, जोर लावावा आणि खरंच सभा उधळून लावावी, असं खुलं आव्हान सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गुलाबराव पाटील यांना दिले आहे. 


आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे Udhhav Thackeray) यांची सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे या पाचोरा शहरात दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांना धारेवर धरत सभा उधळून लावण्याचे खुले आव्हान दिले आहे. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण कमालीचं अस्थिर आहे, अनिश्चित आहे. अशा काळामध्ये गरज आहे की महाराष्ट्रातले एकूण महिला सुरक्षेचे, शेतकऱ्यांचे, असंघटित कामगारांचे किंवा बेरोजगारी, महागाई हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी रचनात्मक कृती कार्यक्रम राबवणारा एक नवा नेता हवा आणि त्यासाठी म्हणून एक दिशादर्शक ती दिशा दाखवणारा असायला हवा. या नात्याने आणि आजच्या सभेकडे पाहत असून या चार लोकांवर टीका करण्यासाठी पक्षप्रमुखांना इथे यायची गरज नाही. महाप्रबोधन यात्रेतून ते काम अचूक पार पाडलेले आहे. आज आर ओ पाटील यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे आले आहेत. तसेच पाटील यांच्या त्यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी एकट्या नाहीत. त्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे खंबीरपणे उभा आहे हे सांगण्यासाठी आणि खानदेशमध्ये अवकाळी पावसाने जे केळी पिकांच नुकसान झालं, एकूण शेतकऱ्यांचे नुकसान झाल, त्या सगळ्यांमध्ये दिलासा देण्यासाठी आणि नवा मार्ग दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे आले असल्याचे अंधारे म्हणाल्या. 


सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिवसेनेबद्दल कलुषित वातावरण तयार करणे हा शिंदे गटातल्या लोकांचा एक आवडता खेळ झालेला आहे. मग आम्हाला वेळ मिळत नव्हता, आम्हाला निधी मिळत नव्हता, आम्हाला भेटू देत नव्हते. त्यांना जर भेटू दिल नसेल, वेळ मिळत नसेल तरी असेच कॅबिनेटमध्ये गेले होते का? गुलाबराव पाटलांना अशीच मंत्रिपदे मिळाली काय? वेळच मिळत नव्हता तर गुलाब पाटलांना शिवतीर्थावर दरवर्षी अशीच बोलायची संधी मिळत होती का? संभ्रमित करणाऱ्या या वाक्यांना म्हणजे ही निव्वळ उथळ वाक्य असल्याचे अंधारे म्हणाल्या. 


राज ठाकरेंना सुनावलं... 


राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सांगितलं कि कोरोना काळात मोठी हानी झाली, त्या लोकांवर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी आम्ही आहोत. कोरोनाची आपत्ती ही निसर्गनिर्मित आपत्ती होती. पण खारघर दुर्घटना ही मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे निर्मित आपत्ती आहे. हा फरक आहे आणि सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करायचे असतील तर त्यांच्यावर करा. कोरोना काळात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी भूमिका निभावली. ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड कौतुक झाले, मोदींनी देखील कौतुक केलं. पण हलगर्जीपणा जर कोणाकडून झाला असेल तर गुजरातमध्ये ज्यांनी रस्त्यावर प्रेत जाळली. त्या भाजपचे मुख्यमंत्र्यांकडून ज्यांनी उत्तर प्रदेशच्या नदीवर प्रयत्न तरंगत ठेवली. त्यांच्याकडून झाला. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जर राज ठाकरेंना करायची असेल तर ती त्यांनी योग्य आदित्यनाथ यांच्याबाबत बोलले पाहिजे, असेही अंधारे म्हणाल्या. 


भावनिक नातं जपणारी सभा 


भावनिक नातं जपणारी सभा आहे. कारण ही सभा दिवंगत आर ओ तात्या हयात असतानाच होणार होती. ती नियोजित सभा होती. त्यांनी इथल्या विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी म्हणून खास निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्याची तयारी सुरू झाली होती, मात्र ते आपल्यात राहिले नाही आणि ती सभा तशीच राहून गेली. त्यांच्यानंतर त्यांच्या तत्वनिष्ठ आयुष्याला पुढे नेत त्यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी हा सगळा डोलारा सांभाळत आहेत आणि पुन्हा ती सभा होत आहेत. फरक एवढाच आहे की ज्या सभेची तारीख त्यावेळी आर ओ पाटील यांनी घेतली होती, ती सभा आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करून होत आहे. हे निश्चितपणे आम्हा सगळ्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांची उणीच जाणवणार आहे.