Cheapest Online Flight : अनेक लोक फ्लाइटने (Flight) प्रवास करण्याची संधी मिळण्याचे स्वप्न पाहतात. परंतु जास्त किंमतीमुळे लोक फ्लाइटऐवजी ट्रेनची तिकिटे खरेदी करतात आणि त्यातून प्रवास करतात. ट्रेनची तिकिटे नक्कीच स्वस्त आहेत. पण जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर तुमचा बराच वेळ वाया जाऊ शकतो, तसेच तुमचा गरजेपेक्षा जास्त थकवाही येऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा आहे तसेच 1 ते 2 तासात तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी पोहोचायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात स्वस्त फ्लाइट बुक करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. प्रत्येक फ्लाइट तिकीट खरेदीवर हजारो रुपये वाजवू शकता. म्हणजेच रेल्वे तिकीट खर्चात फ्लाइट तिकीट बुक करू शकता.
आज आम्ही तुम्हाला एका वेबसाइटबद्दल सांगणार आहोत जिथून तुम्ही सर्वात स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करू शकता. खरं तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण या वेबसाइटचे नाव आहे skyscanner.co.in . जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुमच्या फ्लाइटची माहिती मिळवता, तेव्हा एक नाही तर उपलब्ध असणाऱ्या सर्व फ्लाइटची माहिती तुमच्यासमोर येते. तुम्हाला वेगवेगळ्या वेळा आणि वेगवेगळ्या फ्लाइट्स दाखवल्या जातात. ज्यामधून तुम्ही काही मिनिटांत तुमची आवडती फ्लाइट बुक करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला प्रवास करायचा आहे तो दिवस सोडून तुम्ही फ्लाइट तिकीट बुक केल्यास, त्यांच्या किमती इतक्या कमी आहेत की तुम्ही फक्त ट्रेनच्या खर्चावर फ्लाइट तिकीट बुक करत आहात असे तुम्हाला वाटेल. आम्ही तुम्हाला ज्या वेबसाइटबद्दल सांगत आहोत जी तुम्हाला हव्या असणाऱ्या फ्लाइट्सबद्दलची माहिती तुम्हाला देते ते देखील कमी पैशात. अशा पद्धतीच्या अनेक फ्लाइट तुमच्याकरता या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
कोणत्याही विमान कंपनीच्या वेबसाईटशी तुलना केली तर येथे तिकीटांची किंमत जवळपास निम्म्यापर्यंत उपलब्ध आहे, अशा परिस्थितीत तुम्ही आनंदात सहलीचे नियोजन करत असाल, तर येथून तिकीट बुक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अशा पद्धतीने तुम्ही फ्लाइट बुक केल्यास तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता आणि अनेक दिवसांपासून पाहत असणारे विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होण्यास देखील होऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या
Income Tax Filing : ITR भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस, सहा कोटी लोकांनी दाखल केलं आयकर विवरण