MLA Sanjay Gaikwad Slaps Canteen Staff:  आकाशवाणी येथील आमदार निवास कॅन्टीन मारहाण प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)  यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा अधिकार आम्हाला नाही, आमदारांच्या समितीला आहे. असे अजंता केटर्सच्या मालकाने एबीपी माझशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या आहार समितीकडून संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास किंवा कारवाईस टाळाटाळ का केली जात आहे? या प्रश्नावर आता केटर्स मालकाने भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, तक्रार आणि पुढच्या कारवाई संदर्भात विधिमंडळ आहार समिती आणि विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, त्यामुळे केटरर्सकडून  कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं केटरर्स मालकांनी एबीपी माझाला सांगितला आहे. 

समितीच तक्रार आणि पुढील कारवाई संदर्भात निर्णय घेईल

आमदारांकडून मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याला गावी पाठवलं असून या सगळ्या मारहाण प्रकरणात समितीच तक्रार आणि पुढील कारवाई संदर्भात निर्णय घेईल, असं समितीच्या वतीने केटर्सला सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. केटरर्सकडून संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल का झाली नाही? हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा केटरर्स मालकाकडून एबीपी माझाला हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जर कोणी माध्यम आपल्याशी संपर्क साधला तर आमदारांची समिती त्यांना प्रतिक्रिया देणार असल्याचं ही समितीतील आमदारांकडून सांगण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. 

पोलिसांनी निश्चित याप्रकरणात चौकशी केली पाहिजे- देवेंद्र फडणवीस

बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीआमदार निवास येथील कँटिनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आमदार गायकवाड यांच्यावर सर्वत्र टीका होताना दिसत आहे. तर या प्रकरणाचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनातही उमटताना दिसत आहे.

असे असले तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोटा ठरवला आहे. चौकशीसाठी कुणी तक्रार करायलाच हवी असे नाही, पोलीस स्वतः चौकशी करू शकतात आणि ते नक्की करतील, असे स्वत: मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच चौकशी आणि कारवाईच्या कालावधीसंदर्भात स्पष्टता नसल्याने अधिक आणि  संजय गायकवाड यांच्यावर आता नेमकी काय कारवाई होणार याबद्दल कळू न शकल्याने संभ्रम कायम आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या