Miraj Crime News : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रजमध्ये करणी उतरविण्यासाठी होम करणाऱ्या भोंदूबाबाला सांगली ग्रामीण पोलिसांनी गजाआड केलंय. करणी काढण्यासाठी 9 हजार रुपये घेऊन मध्यरात्री होम पेटवून अघोरी पूजा करताना या भोंदूला अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या सहकार्याने गजाआड (Crime News) केले आहे. बाबूजी लखनऊ असे या भोंदू बाबाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई सुरू केली असून या प्रकरणामुळे अंधश्रद्धेचा आणखी एक प्रकार उजेडात आला आहे.
काळी बाहुली, लिंबू, टाचणी अन् बरेच काही...
पुढे आलेल्या माहितीनुसार, या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे मागील आठवड्यात तक्रार आली होती. त्याप्रमाणे तक्रारदार बिराप्पा पांडेगावकर यांना नकली ग्राहक बनवून त्या बुवाकडे पाठवले. त्या बुवाने करणी उतरवण्यासाठी 9 हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारीच्या रात्री बारा वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे तो कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला. काळी बाहुली, लिंबू, टाचणी, उद याचा वापर करून त्याने एक होम पेटवून अघोरी पूजा केली. पोलिसांनी अघोरी पूजेचे सर्व साहित्य जप्त करून त्याला रात्री पोलीस स्टेशनला आणून सकाळी त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. करणी, भानामती, काळी जादू याची भीती घालून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे.
करणी ही कपोकल्पित गोष्ट, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
जगात कोणाला करणी करता येत नाही किंवा उतरवता येत नाही. करणी ही कपोकल्पित गोष्ट आहे. त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये आणि भोंदूबुवांच्या थापांना बळी पडू नये, अशा भोंदू बाबांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जवळच्या पोलीस स्टेशन कडे तक्रार नोंदवावी असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले आहे.
कोरेगावच्या दोघांकडून थायलंडमध्ये रशियन महिलेवर बलात्कार
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंड फिरण्यासाठी गेले असताना. थायलंड येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या