अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलकास येथील हत्ती पंधरा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. विशेष म्हणजे वनअधिकाऱ्यांनी त्यांची ही रजा मंजूर केली आहे. 10 ते 25 जानेवारी दरम्यान मेळघाटातील हे हत्ती पंधरा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. हत्ती सफारी अंतर्गत पर्यटकांच्या सेवेत राबणाऱ्या सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी आणि जयश्री या हत्तिणींना ही पंधरा दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आल्यामुळे 15 दिवस पर्यटकांना मेळघाटात हत्ती सफारी बंद राहणार आहे. रजेवरील हत्तिणी 26 जानेवारीला कामावर परतणार आहेत. यामुळे 26 जानेवारीपासून हत्ती सफारी पूर्ववत सुरू होणार आहे.
रजा कालावधीत हत्तिणींच्या पायांचे चोपिंग केले जाते. त्यांच्या थकलेल्या पायांची शुश्रूषा केली जाते. गरम पाणी, तेल आणि वेगवेगळ्या वनौषधींचा वापर करून या हत्तिणींचे पाय शेकले जातात. हत्तिणींचे पाय मजबूत आणि निरोगी राहण्याकरिता त्यांच्या पायांना पडलेल्या भेगा भरून काढण्याकरिता सतत 15 दिवस त्यांचे पाय चोपिंग अंतर्गत शेकले जातात. आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक आहार त्यांना दिला जातो. काम करताना, राबताना थकलेल्या पायांना पडलेल्या भेगा भरून काढण्याकरिता, पाय मजबूत आणि निरोगी ठेवण्याकरिता ही शुश्रूषा केली जाते.
मद्यप्राशन करून वाघिणीचे केलेत पाच तुकडे
रानटी डुकरांची शिकार करण्याकरिता 11 हजार केव्हीच्या विद्युत तारांवर आकोडा टाकला मात्र, त्यात तीन वर्षीय सुमारे दीडशे किलो वजनाची वाघीण अडकली आणि तिचा तडफडून मृत्यू झाला. तारांमध्ये फसून शिकार झाल्यानं अकरा केव्हीच्या तरांवरील विद्युत प्रवाह खंडित झाला. शिकारी जेव्हा घटनास्थळावर पोहोचले तेव्हा तिथं भलीमोठी वाघीण फासात अडकून मृत पावल्याचं लक्षात येताचं आरोपींची भंभेरी उडाली आणि त्यांनी मद्यप्राशन करून वाघिणीची विल्हेवाट लावण्याकरिता तिचे अक्षरश: चार नव्हे तर पाच तुकडे केलेत.
आरोपींनी दिली घटनेची कबुली
यानंतर प्लास्टिक बोरीत वाघिणीचे तुकडे भरून ते सायकलवर ठेवून दोन फेऱ्यांमध्ये तिची जंगल परिसरातील तलावाशेजारी फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपींनी मेमोरेंडम पंचनाम्यात कबुली दिलीय. घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागानं राजू वरखडे, दुर्गेश लसुंते, राजेंद्र कुंजाम या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलेत. त्यांचा मेमोरेंडम पंचनामा केला, यावेळी त्यांनी या घटनेची कबुली दिली. सोबतच शेत तलावाच्या पाण्यात पुरविण्यात आलेले विद्युत सापळ्याचे साहित्य, अवजार आणि शिकारीचं संपूर्ण साहित्य आणि त्यात वापरण्यात आलेली सायकल वन विभागाच्या ताब्यात दिली. हे तिन्ही आरोपींना न्यायालयानं 13 जानेवारीपर्यंत वन कोठडी सुनावली असून आरोपींनी केलेल्या जुन्या शिकरींची माहिती मिळविण्याचा वन विभाग प्रयत्न करीत आहे.
हे ही वाचा