Virat Kohli Anushka Sharma Bodyguard Salary : आपण अनेकदा बॉलिवूड सुपरस्टार्सना बॉडीगार्ड्सच्या गराड्यात वेढलेले पाहिले असेल. सेलिब्रिटी जिथे जातात, तिथे हे बॉडीगार्ड्स आधी हजर असतात. कलाकारांवर येणारं कुठलंही संकट ते आधी झेलण्याचं काम करतात. त्यामुळेच त्यांच्यावर बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रेटी लाखो रुपये खर्च करतात. कलाकारांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्डला मोठं मानधन दिलं जाते. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या बॉडीगार्ड्सचा वार्षिक पगार समोर आला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या बॉडीगार्डचं नाव प्रकाश सिंह उर्फ सोनू असं आहे.  विरुष्काच्या सुरक्षेसाठी सोनू घेत असलेला पगार वाचून तुमचे डोळे विस्फरल्याशिवाय राहणार नाहीत. सोनूला मिळणारा पगार देशातील अनेक कंपनीच्या सीईओंच्या पगारापेक्षाही जास्त आहे. पाहूयात कोण आहे सोनू अन् त्याला किती पगार मिळतो त्याबद्दल सविस्तर.... 


कोणताही प्रसिद्ध कलाकार आणि सेलिब्रेटी सार्वजनिक ठिकाणी आल्यानंतर गर्दी होतेच. आवडत्या कलाकाराच्या एका फोटोसाठी चाहते गराडा घालतात. अशावेळी धक्काबुकी अथवा अनुचित प्रकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि कलाकार बॉडिगार्ड नेमतात. त्यासाठी ते लाखो रुपये मोजतात. 'बी टाऊन'मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉडीगार्ड्समध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा बॉडीगार्ड सोनूचे नावही आघाडीवर आहे. तो महिन्याला जवळपास दहा लाख रुपयांचं मानधन घेतो. 


अनुष्का-विराटच्या कुटुंबाचा भाग आहे सोनू - 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनूला मिळणारा पगार कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. सोनू हा अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या कुटुंबाचा भाग आहे. सोनूच्या प्रत्येक वाढदिवसाला अनुष्का-विराट कोहली सेलिब्रेशन करतात.. झिरो चित्रपटाच्या सेटवर अनुष्का शर्मानं सोनूच्या वाढदिवस सेलिब्रेट केला होता. रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्मा प्रेग्नेंट होती, तेव्हा सोनूनं सार्वजनिक ठिकाणी प्रोटेक्ट केलं होतं. त्याशिवाय कोरोना काळात पीपीई किट परिधान करुन अनुष्का शर्माची सुरक्षा केली होती. सोनू फक्त अनुष्का शर्मासाठीच नव्हे तर विराट कोहलीचीही सुरक्षा करतो. 


किती मानधन घेतो सोनू?


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सुरक्षेसाठी मोठी रक्कम मोजतात. सोनू अनेक वर्षांपासून अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड आहे. अनुष्का आणि विराट सोनूला वर्षाला एक कोटी 20 लाख रुपयांचा पगार देतात. म्हणजेच, सोनू महिन्याला जवळपास 10 लाख रुपयांचं मानधन घेतो. हा पगार भारतामधील अनेक कंपन्यांच्या सीईओपेक्षाही जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार, सोनू वर्षाला जवळपास तीन लाख रुपयांचा टॅक्स भरतो. 


आणखी वाचा :
Salman Khan Bodyguard : सलमान खानसोबत नेहमी सावलीसारखा फिरतो, तुम्हाला माहितीये का बॉडीगार्ड ‘शेरा’ किती कमावतो?