दुसरीकडे बीडपाठोपाठ लातूर जिल्ह्याला 604 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
लातूर , बीडला सर्वाधिक निधी
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील 11 लाख 72 हजार 767 शेतकऱ्यांनी 61 कोटी 12 लाख 74 हजार एवढा पीक विमा भरला होता. सुमारे 11 लाख 43 हजार 698 शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे विम्यापोटी शेतकऱ्यांना एकूण 892 कोटी 97 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
बीड नंतर लातूर जिल्ह्याला सर्वाधिक पिक विमा मंजूर झाला आहे. लातूर जिल्ह्यातील 11 लाख 84 हजार 321 शेतकऱ्यांनी 31 कोटी 19 लाख रुपये विमा भरला होता. त्यापैकी 10 लाख 74 हजार 252 लाभार्थी शेतकऱ्यांना 604 कोटी 59 लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे.
राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे बीड आणि लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत.
मराठवाड्याला मिळालेला जिल्हानिहाय पिक विमाः
बीडः 892 कोटी 97 लाख रुपये
लातूरः 604 कोटी 59 लाख रुपये
परभणीः 488 कोटी 65 लाख रुपये
उस्मानाबादः 465 कोटी 50 लाख रुपये
जालनाः 431 कोटी 64 लाख रुपये
औरंगाबादः 158 कोटी 43 लाख रुपये
नांदेडः 245 कोटी 52 लाख रुपये
हिंगोलीः 114 कोटी 67 लाख रुपये