Actor Manoj Bajpayee : सध्या राजकीय पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. लोकसभा निवडणुक (Loksabha Election) जवळपास 3 महिन्यांनी पार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जातेय. अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) देखील लोकसभा निवडणुक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तो बिहारच्या चंपारण्य या मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मनोज वाजपेयी राजकारणात येणार का? असा सवाल अनेकदा त्याला विचारण्यात आला होता. त्याने राजकारणात येणार नसल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मनोज वाजपेयी बिहारमधून लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यावर वाजपेयीने उत्तर दिले आहे. त्यामुळे अभिनेता वाजपेयी निवडणुक लढवणार असल्याच्या अफवांवर पडदा पडला आहे.
काय म्हणाला मनोज वाजपेयी?
मला राजकारणात (Politics) फार इंटरेस्ट आहे, असे वाजपेयी होता. ही बाब त्याने अनेकदा मुलाखतीमधून स्पष्ट केली होती. दरम्यान तो लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची एक पोस्ट ट्वीटरवर तुफान व्हायरल झाली. यामध्ये मनोज वाजपेयी बिहारच्या पश्चिम चंपारण्य या मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
मनोज वाजपेयीनेही केले ट्वीट
मनोज वाजपेयी या अफवेचे ट्वीट रिपोस्ट करत लिहिले की, "ही माहिती तुम्हाला कोणी सांगितली? की तुम्हाला रात्री स्वप्न पडले होते? सांगा ..." असा सवाल मनोज वाजपेयीने अफवा पसरवणाऱ्या लोकांना केलाय. (Manoj Bajpayee Tweet)
गँग ऑफ वासेपूर ते फॅमिली मॅन 2 मनोजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
मनोज वाजपेयीने आजवर अनेक हिट सिनेमे केले. शिवाय, वेब सिरिजच्या (Web Series) माध्यमातूनही तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याच्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. त्याची फॅमिली मॅन ही वेबसिरिज चर्चेचा विषय ठरली होती. गँग ऑफ वासेपूरमधील (Gangs of Wasseypur) त्याच्या अभिनयाने चाहत्यांना चांगली भूरळ घातली होती. चाहते फॅमिली मॅन 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अद्याप फॅमिली मॅन 3 (Family Man 3) बाबत मनोजने कोणतीही अपडेट दिलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या