Gautami Patil:  नृत्यांगणा

  गौतमी पाटील (Gautami Patil)  ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चात्यांना घायाळ करत असते. गौतमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तिची नृत्यशैली सादर करते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे गौतमी चर्चेत असते. आता गौतमीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती "सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम" (Sarkar Tumhi Kelay Market Jam) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गौतमीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र आता नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. गौतमीच्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.


गौतमीला नेटकऱ्यांना का केलं ट्रोल?


गौतमीनं इन्स्टाग्रामवर तिचा "सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम" या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी ही स्टेजवर काही लहान मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. लहान मुलींसोबत डान्स केल्यानंतर काही नेटकरी गौतमीला ट्रोल करत आहेत. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


एका नेटकऱ्यानं गौतमीला कमेंट केली,  "तू नाच आणि अजून तुझ्या पुढे 10 तयार कर नाचायला. काय माय जरातर लाजावं की. देशाच भविष्य नाचवताना." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "लहान मुली आहेत एवढी तरी आकल ठेवा" काही नेटकऱ्यांनी गौतमीच्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं तर काहींनी तिच्या नृत्यशैलीचं कौतुक देखील केलं. 


पाहा व्हिडीओ:






गौतमीच्या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती


गौतमीच्या  माझा कारभार सोपा नसतोय रं, दिलाचं पाखरू, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम,पाटलांचा बैलगाडा या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तिच्या गाण्यांवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. गौतमी तिच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.


काही दिवसांपूर्वी गौतमीचं 'घोटाळा झाला' हे गाणं  Being Filmy Creations या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली. तसेच तिचा   'घुंगरु'  हा चित्रपट देखील रिलीज झाला.या चित्रपटाचं दिग्दर्शन  बाबा गायकवाड (Baba Gaikwad) यांनी  केलं आहे.


संबंधित बातम्या:


Gautami Patil: "दिलाचं पाखरू" नंतर आता "घोटाळा झाला"; सबसे कातील गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा