LIVE -

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद SC प्रवर्गासाठी आरक्षित, 68 पैकी 39 जागा महिलांसाठी, ओबीसी प्रवर्गासाठी 19 जागा, त्यापैकी 9 जागा महिलांसाठी राखीव, जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा जयमाला गायकवाड यांचा गटही आरक्षित

SC प्रवर्गः

एकूण जागा-10

महिला-5

ST प्रवर्गः

एकूण जागा-1

पुरुष-1

खुला प्रवर्ग :

एकूण जागा-39

महिला-20

अहमदनगर जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर,  अनेक दिग्गजांना धक्का, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड यांचा कुलधरण गट, तर काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचा बेलवंडी गट आरक्षित

मुंबईः राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत राज्य सरकार आज मुंबईत जाहीर करणार आहे. नगरपालिकांचे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडण्यात येणार असल्याने या आरक्षण सोडतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नगरपालिकांचे नगराध्यक्ष प्रथमच थेट जनतेमधून निवडण्यात येणार आहेत. राज्यातील 195 नगरपालिकांची मुदत डिसेंबर 2016  ते फेब्रुवारी 2017 या दरम्यान संपुष्टात येत आहे. तसंच नव्याने 19 नगरपालिकांची निर्मिती करण्यात आली आहे.

या सर्व नगरपालिकांची निवडणूक होणार असून त्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचं लक्ष लागलं आहे.