कल्याणमधील भाजप नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ अटक
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 11:17 PM (IST)
कल्याण : कल्याणमधील भाजप नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गणेश भाने असं या लाचखोर भाजप नगरसेवकाचं नाव आहे. घरदुरुस्तीची परवानगी देण्यासाठी गणेश भाने या नगरसेवकानं 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. वॉर्ड क्रमांक 44 येथील नेतीवली टेकडी या भागातील एक महिलेच्या घराची पडझड झाली होती. घराच्या दुरुस्तीचं काम या महिलेनं एका कंत्राटदारानं दिलं. दुरुस्तीच्या परवानगीसाठी कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी भानेंनी केली. तडजोड करुन 1 लाख रुपये ही रक्कम निश्चित झाली. त्यानंतर तिसगाव नाक्याजवळ पैशांची देवाणघेवाण करताना गणेश भाने आणि साथीदार श्रीकांत नागरेला रंगेहाथ अटक करण्यात आली.