मुंबई: मुंबईसह दहा महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर,आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या निमित्ताने एक नवं राजकीय समीकरण समोर येत आहे. भाजपला रोखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे.
जिल्हा पातळीवर भाजप वगळता शक्य त्या पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
शिवसेना नेते आणि संपर्कप्रमुखांना जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.
मात्र मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिल्याने परतफेड म्हणून पुणे आणि पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेना भाजपला पाठिंबा देणार आहे.
पुण्यात भाजपला 98 आणि शिवसेनेला 10 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीला 38 जागांवर समाधान मानावं लागलं.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने तब्बल 77 जागी यश मिळवलं. तर शिवसेना 9 आणि सत्ताधीर राष्ट्रवादीला 36 जागा मिळाल्या आहेत.