"जर मी देशाचं रक्षण करताना शहीद झालो, तर नितीमत्ता भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावू नये ही माझी शेवटची इच्छा असेल", असं लान्स हवालदार रणजीत गावडे यांनी म्हटलं आहे.
या आशयाचा व्हिडीओ आणि होर्डिंग्ज त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.
दिवसेंदिवस भारतीय सैनीकांबद्दल अपशब्द वापरले जात असल्यानं रणजीत गावडे यांनी हे पाऊल उचललं आहे.
मी शहीद झालो, तर नितीमत्ता भ्रष्ट नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावू नये. सन्मानाने जगण्यासाठी आणि या भुंकणाऱ्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळ्यांनो संघटीत व्हा, असा मजकूर सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाळुंगे गावातील होर्डिंगवर झळकतोय.
लान्स हवालदार रणजीत गावडे सध्या जम्मू काश्मिरमध्ये सेवा बजावत आहेत.
सध्या देशात सैनिकांबद्दल लोकप्रतिनिधी अपशब्द वापरत आहेत. देशाचं रक्षण करण्यासाठी जे सैनिक आपल्या जीवाचं बलिदान देतात, त्यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांविरोधात सैनिक मावळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी व्हिडीओ आणि होर्डिंगद्वारे केलं आहे.
या होर्डींगची चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरु आहे.
VIDEO: