जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल आणि त्यांचे सहकारी अधिकारी इस्लामपूरला निवडणुकीच्या कामकाजानिमित्त गेले होते. रात्री उशिरा ते शासकीय गाडीतून कोल्हापूरकडे येत होते. किणी टोल नाक्याच्या लेन क्रमांक सातवर टोल कर्मचार्याने त्यांची गाडी अडवली. यावेळी कर्मचारी विजय शेवडे याने टोल देण्याची मागणी केली.
VIDEO | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंना टोलनाक्यावर शिवीगाळ करत धक्काबुक्की | एबीपी माझा
यावेळी गाडीत पुढच्या सीटवर बसलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, ही गाडी शासनाची असून, आम्ही सर्वजण शासकीय अधिकारी आहोत. मात्र, शेवडे याने आपले ओळखपत्र दाखवा, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यानंतर हे चालत नाही, असे जुजबी उत्तर देऊन टोल भरावा लागेल, असा अट्टाहास त्याने धरला. यावेळी मित्तल यांना या टोल नाक्याच्या मॅनेजरने देखील हे ओळखपत्र चालत नसल्याचे सांगितले.
दरम्यान, मित्तल यांनी मॅनेजरचे ओळखपत्र पहिले. तेच ओळखपत्र मुदतीच्या बाहेर गेल्याचे निदर्शनास आणून दिल्याने नाक्यावरील कर्मचारी संतप्त झाले. आम्ही तुमच्यासारखे दहा अधिकारी विकत घेऊ शकतो, असे म्हणून त्यांनी मित्तल यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यानंतर मित्तल आणि त्यांच्या सहकार्यांनी वडगाव पोलीस ठाणे गाठले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राहुल कदम यांनी टोल व्यवस्थापन आणि कर्मचारी शेवडे याच्यासह एका कर्मचार्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
दरम्यान, या टोल नाक्यावर अशिक्षित, गुन्हेगारी वृत्तीचे कर्मचारी नेमले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावणार असल्याचे एका अधिकार्याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
VIDEO | सातारा: उदयनराजे-शिवेंद्रराजे यांच्यात वादावादी