पुणे : ग्राहकाने ऑर्डर केलेल्या पनीर मसाल्याच्या डिशऐवजी चिकनची डिलीव्हरी करणं झोमॅटोसह पुण्याच्या हॉटेलला चांगलंच महागात पडलं आहे. ग्राहक न्यायालयाने या हलगर्जीप्रकरणी दोघांना 55 हजारांचा दंड ठोठावला आहे.
तक्रारदार वकील षणमुख देशमुख यांना येत्या 45 दिवसांत ही रक्कम देण्याच आदेश ग्राहक कोर्टाने झोमॅटोला दिल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. देशमुख यांनी पनीर बटर मसाला ऑर्डर केला होता, मात्र त्यांना बटर चिकन पाठवण्यात आलं. दोन्ही पदार्थांच्या रंगसाधर्म्यामुळे देशमुख यांना फरक लक्षात आला नाही आणि त्यांनी चिकन खाल्ल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
आपण तक्रारदाराला रिफंड दिलं असून केवळ बदनामीसाठी ग्राहकाने तक्रार केल्याचा दावा झोमॅटोने केला आहे. यामध्ये चुकीची डिश पाठवणाऱ्या हॉटेलची चूक आहे, असं झोमॅटोने ग्राहक मंचाला सांगितलं, मात्र झोमॅटोलाही मंचाने तितकंच दोषी मानलं आहे. हॉटेलने आपली चूक आधीच मान्य केली होती.
सेवेत कसूर आणि मानसिक त्रासाबद्दल षणमुख देशमुख यांना 55 हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने झोमॅटो आणि पुण्यातील संबंधित हॉटेलला दिले आहेत.
गेल्याच महिन्यात विधानभवनाच्या कँटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकन आढळल्याचा प्रकार सरकारी अधिकाऱ्याकडून उघड झाला होता. त्यानंतर संबंधित कंत्राटदार निष्काळजीपणे कँटीन चालवत असल्याची तक्रार विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे करण्यात आली.
पनीरऐवजी चिकनची डिलीव्हरी, झोमॅटोसह पुण्याच्या हॉटेलला 55 हजारांचा दंड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2019 09:25 PM (IST)
तक्रारदार षणमुख देशमुख यांनी पनीर बटर मसाला ऑर्डर केला होता, मात्र त्यांना बटर चिकन पाठवण्यात आलं.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -