लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधील तरुणांनी रक्तदान करुन नवीन वर्षाचं स्वागत करुन अनोखा आदर्श उभा केलाय. एकीकडे थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन होत असताना या तरुणांनी रक्तदान करुन नवीन वर्षाचं स्वागत केलं.

अहमदपूरच्या शिवाजी चौकात हे रक्तदान शिबिर पार पडलं. यामध्ये 48 रक्तदात्यांनी रक्तदान केल. या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार विनायक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.



रक्तदानामुळे कुणाला जीवदान मिळू शकते, नवीन वर्षाचं स्वागत यापेक्षा चांगलं असूच शकत नाही, असा संदेश या तरुणांनी दिला.