राहुल साळवेला 2010 मध्ये एक अपघातात अपंगत्व आले. त्या अपघाताच्यावेळी राहुलला 100 अपरिचित लोकांनी रक्तदान करुन रक्त दिले. त्यामुळेच तो बरा होऊ शकला. त्यानंतर राहुलच्या मनात लोकांना मदत करायची ही जाणीव होती. यासाठी राहुलला साथ मिळाली ती 22 वर्ष एका आजारामुळे खिळून राहिलेल्या दीक्षा दिंडेची. शिवाय पुण्यातून पूजा भडांगे, चिन्मय साळवी, सुजीत नवले, साताऱ्यातून सुनील चव्हाण, कोल्हापुरातून सिद्धांत मंगोलीकर आणि मुंबईतून रुपाली कदम आणि नितीन जाधव हे त्यांच्या मदतीला धावून आले.
पुण्यात पोलिसांच्या मदतीने रक्तदान शिबीर करता येईल का याचीही चाचपणी सध्या ते करत आहेत. एकूणच सध्याच्या परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी राहुल साळवे, दिशा दिंडे आणि त्यांच्या टीमसारखे तरुण बाहेर येऊन प्रयत्न करत आहेत. त्यांना राज्यातील सगळ्यांनाच रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी (Rahul Siddharth Salve 9967116687, Diksha Dinde- 8850218378) या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
रक्ताचा तुटवडा, रक्तदान करावं : राजेश टोपे
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसंचय आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये, हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करुन रक्तदान शिबिरं घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टन्सिंग पाळावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.