सांगली : सांगली शहरात एका महिला आणि पुरुषाचं भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाची हत्या झाली आहे. काल मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. नरसू वाघमारे असं या तरुणाचं नाव आहे.

सांगलीच्या गोकुळनगर भागात एका महिलेचं पुरुषाशी भांडण सुरु होतं. हे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाची पुरुषासोबत झटापट झाली. यावेळी चाकूचे वार झाल्याने तरुण गंभीर जखमी झाला. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान ज्या पुरुषासोबत तरुणाची झटापट झाली तो दारु पिऊन होता. दारुच्या नशेत चाकूचे वार तरुणावर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.