औरंगाबाद : ऐन दिवाळीला औरंगाबादमधील जिल्हा परिषद मैदानावर घडलेल्या अग्नितांडवाची भीषण दृश्यं अजूनही थरकाप उडवतात. मात्र या आगीला सुरुवात कशी झाली आणि काही मिनिटांतच आगीने रौद्ररुप कसं धारण केलं, याचा व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. काय घडलं नेमकं? औरंगाबादमधील जिल्हा परिषद मैदानात दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचं बाजर भरतो. यंदाही मैदानात फटाक्यांचे सुमारे 142 स्टॉल्स लागले होते. मात्र 29 ऑक्टोबर रोजी स्टॉल क्रमांक 49 आणि 50 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. परंतु दुकानं लागूनच असल्याने क्षणार्धात आग पसरली आणि सगळी दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. इतकंच नाही तर या आगीत 112 वाहनांचाही कोळसा झाला. शेकडो छोट्या-मोठ्या वाहनांची अक्षरक्षः राख होऊन कोट्यवधींचं नुकसान झालं. सुदैवानं या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या

VIDEO : औरंगाबादमधील अग्नितांडवाची एक्स्लुझिव्ह दृश्यं

औरंगाबादमधल्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?

औरंगाबादमध्ये अग्नितांडव, 142 फटाक्यांची दुकानं पेटली

अग्नितांडव : औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं?

असंवेदनशीलतेचा कळस, बेचिराख फटाका मार्केट बनलं सेल्फी पॉईंट

औरंगाबाद अग्नितांडव : अग्निशमन दलाचे प्रमुख निलंबित