अमरावती : देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी पोटच्या दोन चिमुकल्यांचा बळी दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात खडीमल गावात घडली आहे. तीनशे फूट खोल दरीत मुलांना फेकून निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे.
दिवाळीच्या दिवशी सुधाकर भाऊसावलकर याने आपल्या आतिष आणि आकाश या दोन चिमुकल्यांची अत्यंत निर्दयीपणे अज्ञातस्थळी नेऊन हत्या केली. दिवाळी अमावस्येचा दिवस असल्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी त्याने स्वतःच्याच मुलांचा बळी दिला.
आरोपी सुधाकरने मुलांना डोलारदेव बाबा जंगलातील खोल नेले. दोन्ही मुलांना उभे केले आणि मान खाली करायला लावली. दोन्ही लहानग्यांनी वडीलांचा आदेश पाळला. त्यांनी डोके जमिनीचे करताच सुधाकरने कुर्हाडीने वार करुन त्यांची अमानुष हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.