यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छपा, 23 जणांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2017 06:26 PM (IST)
यवतमाळमध्ये सुरु असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांनी छापा टाकून तब्बल 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
फाईल फोटो
यवतमाळ : यवतमाळमध्ये सुरु असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांनी छापा टाकून तब्बल 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरील सुर्दापूर येथील आंतरराज्यीय जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या पथकाने छापा टाकला. या छापेमारीत 2 लाख 54 हजारची रोकड, 23 मोबाईल, 12 वाहने आणि जुगार साहित्य असा एकूण 55 लाख 49 हजार 230 रु मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, या प्रकरणी तेलंगणा-आंध्र प्रदेशातील रंगारेड्ड, करीमनगर, आदिलाबाद, हैदराबाद, जगतीयार या जिल्ह्यातील तब्बल 23 जणांना अटक केली आहे.