नागपूर : मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले असतानाच पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पोलिसांनी 21 नोव्हेंबरला मध्यरात्री एका पोलिस अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. महत्त्वाची बाब म्हणजे लॉटरी व्यावसायिकाच्या अपहरण आणि हत्या झाल्यादिवशीच मध्यरात्री ढोल ताशांच्या गजरात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

नागपुरातील अपहृत लॉटरी व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा संशय

नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये युवराज ढोले नावाच्या हेड कॉन्स्टेबलचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात हे सेलिब्रेशन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांपैकी एकानं या सेलिब्रेशनचं रेकॉर्डिंग करुन फेसबुकवर टाकलं आणि पोलिसांवर टीकेची झोड उठू लागली.

नागपुरात एक कोटींच्या खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण

सामान्य नागरिकांना रात्री 10 नंतर ध्वनी प्रदुषण केल्यास कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पोलिसांनीच मध्यरात्री नियमांचं उल्लंघन केल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे. सामान्य नागरिकांना नियम शिकवणाऱ्या पोलिसांना हे नियम लागू पडत नाहीत का असा सवाल नागपूरकरांनी विचारायला सुरुवात केली आहे.