राहुल गांधींच्या भेटीने चर्चेत आलेल्या कलावतींना पुत्रशोक
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2017 05:31 PM (IST)
यवतमाळ : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या शेतकऱ्याच्या विधवा कलावती यांना पुत्रशोक झाला आहे. यवतमाळच्या जळका गावात राहणाऱ्या कलावती बांदूरकर यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं. बलराम बांदूरकर त्याच्या मित्रासोबत दुचाकीने गावाकडे येत असताना त्याला अपघात झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर कलावती प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांना सात मुली आणि दोन मुलं आहेत. त्यापैकी सर्वात धाकट्या म्हणजे 19 वर्षांच्या बलरामचा मृत्यू झाला.