शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या पालकमंत्रिपदाची धुरा काढून घेतल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतून शिवसेनेच्या मंत्र्यांना वॉकआऊट केलं. त्यामुळे शिवसेना-भाजपमधली धुसफूस पुन्हा समोर आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतून शिवसेना वॉकआऊट
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचं पद काढून वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. वाशिम हा तुलनेनं छोटा जिल्हा आहे, त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. परिणामी सेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला.