यवतमाळमध्ये ट्रेलर चार घरात घुसला, दोन जखमी, 8 जनावरं चिरडली
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2017 10:29 AM (IST)
यवतमाळ : यवतमाळमध्ये रस्त्यावरुन जाणारा ट्रेलर चार घरांमध्ये घुसला. आर्णी मार्गावरील किन्ही गावात आज सकाळी ही घटना घडली. या घटनेत एक मुलगी आणि महिला जखमी झाली असून ट्रेलरने आठ जनावरांना चिरडलं. शिवाय चारही घरांचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं. परंतु पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप केल्याने वातावरण आता निवळलं आहे.