पुण्यातील टेमघर धरणाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 22 Mar 2017 07:48 AM (IST)
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाची दुरूस्ती करण्याची तयारी औरंगाबादेतल्या एका कंपनीने दाखवली आहे. टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. जलसंपदा विभागानं धरणाच्या दुरूस्तीसाठी 98 कोटी मंजूरही केले आहेत. परंतु धरणाच्या भींतीची अवस्था पाहून कुठलीही कंपनी दुरूस्तीसाठी येत नव्हती. मात्र आता धरणाच्या दुरूस्तीला सुरूवात झाली आहे. धरणाच्या दुरुस्तीसाठी टेमघर धरण मोकळं करण्यात आल्याने धरणाची भींत उघडी पडली आहे. या भींतीला पडलेले खड्डे आणि भींतीचं निकृष्ट दर्जाचं काम यामुळे हे धरण कीती धोकादायक ठरु शकतं याचा अंदाज येत आहे. टेमघर गळतीप्रकरणी 10 अभियंत्यांना निलंबीत करण्यात आलं होतं, तर 34 जणांवर कारवाई करण्यात आली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी धरणाची पाहणी केल्यानंतर ही कारवाई केली. शिवाय श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन या धरणाचं काम केलेल्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही महाजन यांनी सांगितलं होतं. संबंधित बातम्या :