मोदी आत्महत्येला जबाबदार, शेतकऱ्याने विष पिऊन आयुष्य संपवलं!
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2018 03:49 PM (IST)
महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.
यवतमाळ : यवतमाळच्या राजूरवाडी गावात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शंकर चायरे (वय 50 वर्ष) असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी विष पिऊन आयुष्य संपवलं. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. शंकर चायरे यांनी नऊ एकर जागेत कापसाची लागवड केली होती. शेतीसाठी त्यांनी सोसायटीचं 90 हजार रुपये आणि खासगी 3 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु बोंडअळीमुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे त्यांनी आज विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.