खंडोबा मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येत आहे. या मिरवणुकीसाठी हत्तीला आणलं होतं. मात्र सकाळी हत्तीला प्रवरा नदी पात्रात डुंबण्यासाठी नेलं असता, हत्तीने 5 तास नदीतच ठिय्या मांडला. मिरवणुकीची वेळ होऊनही, काही केल्या हत्ती नदीबाहेर येतच नव्हता.
त्यामुळे सकाळी सात वाजता सुरु होणारी मिरवणूक, हत्तीसाठी चार तास रखडली. हत्ती पाण्यातून बाहेर न आल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत मिरवणूक सुरुच झाली नाही.
मिरवणुकीचा हत्तीच नदीबाहेर न आल्याने, मिरवणूक काढायची कशी हा प्रश्न आयोजकांना पडला.
अखेर 11 नंतर उंट-घोड्यांच्या दिमतीने मिरवणूक सुरु करण्यात आली.
त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास हत्तीला नदीबाहेर काढण्यात यश आलं. मग त्याला सजवून मिरवणुकीत नेण्यात आलं.
हत्तीला मनसोक्त डुंबताना पाहण्यासाठी प्रवरा नदीच्या पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
संबंधित बातम्या
मिरवणुकीसाठी आणलेला हत्ती नदीतून बाहेरच येईना