Yavatmal News : यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यात 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. तर अनेकांचे संसार अक्षरक्ष: उघड्यावर आले होते. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे 4 हजार 68 घरांची अंशतः आणि  पूर्णतः  नुकसान झाले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले होते. त्यानंतर नुकसानग्रस्तची यादी बनवून अहवालही तयार करण्यात आला आणि निधीची मागणीही राज्यशासनाकडे पाठविण्यात आली.


मात्र, या घटनेला आता दोन वर्ष उलटली असून आता तिसरा पावसाळा आलाय. तरी शासनाकडून लाभार्थ्यांना अद्याप मदत मिळू शकली नाही. त्यामुळे सुमारे 4 हजार 68 घरांची आणि 671 दुकानांची झालेली नुकसान भरपाई नेमकी कधी मिळणार? असा संतप्त सवाल पीडित नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 


दोन वर्ष लोटली, तिसरा पावसाळा आला, तरी प्रतिक्षाच!


यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन वर्षे अतिवृष्टीमुळे घरांची परझड झाली होती. नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून पंचनामे करून 8 कोटी 87 लाख 83 हजार रकमेची मागणीही केली. मात्र, अजुनही दोन वर्षात नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळाली नाही. अतिवृष्टीच्या नुकसानीत जवळ होतं नव्हतं ते सारं हिरावून घेतले. त्यामुळे नागरिकांनी सरकारी मदतीची फार काळ वाट न पाहता  जवळ असलेल्या जमा पुंजी खर्च करुन संसार उभा केला. मात्र आज ही घटना होऊन दोन वर्ष लोटली असून तिसरा पावसाळा आला आहे. यामुळे आतातरी मदत मिळावी, अशी आशा नुकसानग्रस्त नागरिकांची आहे. परिणामी, कधीपर्यंत प्रशासनाच्या मदतीची वाट पाहावी, असा प्रश्न मोलमजुरी करून पोट भरणार्‍या नागरिकांनसमोर उभा राहिला आहे. 


ग्रामपंचायत प्रशासन विरोधात नागरिकांचा संताप


वाशिमच्या रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायत वाकद येथे ग्रामविकास अधिकारी हजर राहत नसल्यानं, तसेच ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारमुळे घरकुल, नाले सफाई, पाणी पुरवठा योजना तसेच विविध विकास कामे ठप्प होत आहेत. मात्र याकडे वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायत विरोधात विविध विकासकामे प्रलंबित असलेले कामे तात्काळ करावी, या मागणीसाठी नागरिक संतप्त झाले आहेत. यात  उपसरपंच तसेच इतर सदस्य, वंचित बहुजन आघाडी, रिसोड तालुकाच्या वतीने आज ग्रामपंचायत विरुद्ध वाकद येथे रिसोड-मेहकर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. जवळपास 45 मिनिटं चाललेल्या आंदोलन मुळे वाहतूक खोळंबली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?