Hijab Ban News : चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजनं (Acharya Maratha College of Chembur) ड्रेसकोडच्या माध्यमातून हिजाबवर बंदी (Hijab Ban) लागू केली आहे. हिजाब बंदीला नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिलं होतं. ते आव्हान न्यायालयानं फेटाळलं आहे. हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. मात्र, याचिकेतील आरोपांचं कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन करण्यात आलं आहे.  कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे कॉलेजचं म्हणणं आहे. 


एन.जी. महाविद्यालयाने घातलेली हिजाब बंदी योग्य


एन.जी. महाविद्यालयाने घातलेली हिजाब बंदी योग्य आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. नकाबबंदीच्या विरोधातली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबईतल्या महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयासमोर हा युक्तिवाद केला की महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब, नकाब आणि बुरख्यावरची बंदी केवळ एक समान ड्रेसकोडसाठी लागू करण्यात आली आहे. मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणं हा त्यामागचा हेतू नाही. चेंबुरच्या ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, स्टोरी, टोपी आणि इतर कुठल्याही प्रकारच्या बॅजवर बंदी घातली. या निर्णयाला नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, न्यायालयानं आव्हानं फेटाळलं आहे. 


महाविद्यालयाने हा नियम घालून देणं म्हणजे मनमानी : याचिकाकर्त्या विद्यार्थिनी


महाविद्यालयाने घालून दिलेला नियम हा आमच्या धर्माचं पालन करण्याच्या अधिकाराचं, गोपनीयतेच्या अधिकाराचं आणि निवडीच्या अधिकाराचं उल्लंघन करतो. महाविद्यालयाने हा नियम घालून देणं म्हणजे मनमानी आहे. तसंच हा नियम अवास्तव आणि कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आहे असंही या मुलींनी याचिकेत म्हटलं होतं. तसंच हा नियम विकृत असल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे. एनजी महाविद्यालयाने घातलेली नकाबबंदी योग्यच आहे असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. 


दरम्यान, न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने 26 जून रोजी निकाल देणार असल्याचे सांगितलं  होतं. आता या प्रकरणी आज निकाल देण्यात आला आहे. मुलींची याचिका फेटाळण्यात आली आहे. एन.जी. महाविद्यालयाने घातलेली हिजाब बंदी योग्य आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Iran Hijab Row : महिलांवर हिजाब परिधान करण्याची सक्ती! कायदा मोडणाऱ्यांना शवागारात मृतहेदांची स्वच्छता करण्याची शिक्षा