Dr Prashant Chakkarwar Covid treatment Theory : करोरोना काळात केलेल्या यवतमाळमधील डॉक्टराच्या कामाची चर्चा विदेशातही होत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने यवतमाळमधील डॉक्टराच्या कामाची दखल घेतली आहे. यवतमाळ येथील मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रशांत चक्करवार यांनी केलेल्या संशोधनाची ऑस्ट्रेलिया सरकारने दखल घेतली आहे. कोरोना काळात डॉक्टर प्रशांत चक्करवार यांनी केलेलं संशोधन मैलाचं दगड ठरले आहे. डॉक्टर प्रशांत चक्करवार यांच्यामुळे यवतमाळ आणि महाराष्ट्राचे नाव विदेशात पोहचले आहे.


कोरोना रोखणाऱ्या मोंन्टेलुकास्ट या औषधीच्या गुणधर्माबाबत डॉक्टर प्रशांत चक्करवार यांनी संशोधन केलं. त्यांनी केलेल्या संशोधनाला ऑस्ट्रेलिया सरकारने इनोव्हेशन पेटंट बहाल केले आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णवर उपचार करण्यासाठी मोंन्टेलुकास्ट औषधिची मदत होणार आहे.  डॉक्टर प्रशांत चक्करवार यांनी हे औषध कोरोना बाधित रुग्णांसाठी उपचारात उपयोगी ठरू शकते, असे संशोधनातून सिद्ध केल आहे. अस्थमा रुग्णांसाठी हे औषध वापरले जातेय. त्याच मोंन्टेलुकास्ट औषध बाबत डॉ चक्करवार यांनी बरेच दिवस संशोधन केले.  26 जुलै 2021 रोजी याबाबत ऑस्ट्रेलिया सरकारला पेटंट साठी प्रस्ताव पाठविला होता, त्याला 24 डिसेंबर रोजी मान्यता मिळाली आहे .


कोव्हिडं मुळे होणाऱ्या जीवघेण्या सायटोकाईन स्टोर्मला हे मोंन्टेलुकास्ट औषध रोखू शकते, तसेच मोंन्टेलुकास्ट औषधामुळे कोरोना रुग्णाच्या शरीरात रक्ताच्यागाठी होण्याच्या प्रक्रियेला मोंन्टेलुकास्ट रोखू शकते. त्याशिवाय फुफ्फुसाच्या सुजन वाढण्यापासून मोंन्टेलुकास्ट रोखते असा दावा डॉक्टर प्रशांत चक्करवार यांनी केला आहे. आता कुठल्याही कोरोना व्हेरियंट मध्ये मोंन्टेलुकास्ट उपयोग ठरणार असेही डॉ प्रशांत  चक्करवार यांनी दावा केला आहे. त्यावर भारत सरकारने अधिक ठिकाणी संशोधन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. आता डॉ प्रशांत चक्करवार यांनी केलेल्या संशोधनाची ऑस्ट्रेलिया सरकारने   दखल घेतली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने डॉ चक्करवार यांना इनोव्हेशन पेटंट बहाल केले आहे.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live