यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी येथील दर्शन दुगड (Darshan Dugad) या 25 वर्षीय तरुणाने देशातील सर्वात महत्त्वाच्या यूपीएससी परीक्षेमध्ये मोठं यश मिळवलं आहे. दर्शन दुगड या तरुणाने वयाच्या 25 व्या वर्षी यूपीएससीतून यश मिळवलं आहे. त्याने हे यश दुसऱ्या प्रयत्नामध्ये मिळवलं असून देशात 138 वा क्रमांक पटकावला आहे. 

Continues below advertisement


आर्णि या गावच्या दर्शन दुगड याचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं. त्यानंतर त्याने इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर दर्शनने दोन वर्षे एका खासगी कंपनीत काम केले. गेल्या तीन वर्षांपासून त्याने यूपीएससीची तयारी केली असून दुसऱ्या प्रयत्नामध्ये, वयाच्या 25 व्या वर्षी उत्तीर्ण होत यशाला गवसणी घातली. दर्शनला मिळालेल्या या घवघवीत यशाचे श्रेय हे त्याच्या आई वडिलांचे असल्याचं तो सांगतो. दर्शनच्या आई आणि बहीणीला त्याच्या या यशाने खूप आनंद झाला असून आपल्याला रात्रभर आनंदाने झोप लागली नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


दर्शनने दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्याने यश खेचून आणलं. दर्शनचे शिक्षण बीटेक सिव्हिल असं असून शिक्षणानंतर त्याने दोन वर्ष एका  कंट्रक्शन कंपनी मध्ये जॉब केला. जॉब सोडून त्याने यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली गाठली. त्याला दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळाले आहे आज त्याच्या यशाने आर्णी च्या परिवारात आनंद आहे सतत कुटुंबातील सदस्याना अभिनंदन चे फोन येत आहे.


संबंधित बातम्या :