मुंबई : रिओ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेला पुन्हा संधी मिळणार आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी राहुलला मंगोलियाला जाईल आणि त्यासाठी सरकार सर्वतोपरीने मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे

 

खरंतर जॉर्जियामध्ये भारतीय कुस्ती संघाचं सराव शिबीर झालं होतं. जॉर्जियाहून संपूर्ण संघ तुर्कस्तान आणि मंगोलियासाठी जाणार होता. पण राहुलला केवळ जॉर्जियाचा व्हिसा देण्यात आला. तर अमितकुमार आणि संदीप तोमरला अनुक्रमे मंगोलिया आणि तुर्कस्तानचाही व्हिसा देण्यात आला. ही चाल म्हणजे थेट राहुल आवारेवर झालेला अन्याय असल्याची भावना महाराष्ट्राच्या कुस्ती समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.

 

राहुलवर झालेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रातले सगळे मल्ल एकवटले. तर स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या बैठकीत ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी राहुलला मंगोलियाला पाठवलं जाईल आणि सरकार त्याला मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

http://abpmajha.abplive.in/videos/khel-majha-feeling-of-injustice-with-wrestler-rahul-aware-211808