पुण्यातील तरुणीचा मृत्यू बसच्या धडकेत नाही : पोलिस
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2016 03:06 AM (IST)
पुणे : पुण्यातील तरुणीचा मृत्यू महापालिकेच्या बसच्या धडकेत नव्हे तर दुभाजकाला धडकून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीनंतर पोलिसांनी ही माहिती दिली. सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलाजवळ तिचा अपघात झाला. यानंतर अॅक्टिव्हास्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यानंतर पालिकेच्या असंवेदनशील कारभाराचा कळस पाहायला मिळाला. अपघातानंतर तरुणीचा मृतदेह पाऊण तास रस्त्यावर तसाच पडून होता. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यानंतर अखेर तिचा मृतदेह उचलण्यासाठी रुग्णवाहिका आली.