World Sparrow Day 2022 : आज जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day 2022). ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झाली आहे. यातूनच 2010 पासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो आहे. याच दिवसानिमित्त सांगली जिल्ह्यातील कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, येथील कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने हुबेहूब चिमणीचे चित्र रेखाटून चिमणी संवर्धनाचा संदेश दिला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. 


उन्हाळा सुरु झाला आहे. या कडक उन्हात सगळ्यांनी आपल्या अंगणात चारा-पाणी ठेवून पक्ष्यांप्रती जिव्हाळा दाखवावा. या जाणीवेतूनच समाज आणि विद्यार्थ्यांपर्यंत संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,पेठ येथील कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी हा अनोखा समाज संदेश दिला आहे. मानवाच्या चुकीच्या राहणीमान पद्धतीमुळे, जीवनशैलीमुळे तसेच आधुनिक यांत्रिकीकरणामुळे शहरी आणि ग्रामीण भागातून चिमणी हद्दपार होऊ लागली आहे. त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि त्यांचे संवर्धन आणि संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश या रंगीत चित्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. 


चिमण्यांना वाचविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे ?


१) उन्हाची तीव्रता वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.
२) या पक्षांसाठी कमीत कमी दहा फूट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.
३) पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकावे. उरलेले अन्न पक्षांना टाकावे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha