बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीचा खून केल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. डोक्यात दगड घालून ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19 वर्ष) या मुलीचा आईनेच खून केला. यानंतर आरोपी आई संजीवनी हरीदास बोभाटे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली. बारामतीच्या प्रगतीनगर भागातील ही घटना आहे.
खून झालेल्या मुलीने काही दिवसापूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र यानंतर तिचा पती तिला नांदवत नव्हता. तसंच मयत मुलीने तिच्या पतीविरुद्ध तक्रारही पोलीस स्टेशनला दाखल केली होती. यात त्या पतीवर गुन्हाही दाखल झाला होता. मुलीने नांदावे यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींबरोबर चर्चाही केली होती.
मात्र ऋतुजाचा पती नांदवत नसल्याने मुलीची आणि तिच्या आईची घरी रोज वाद होत होते. आज अशाच एका घरगुती कारणाच्या वादातून रागाच्या भरात त्या मुलीच्या आईने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. यानंतर ती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाली.
गेल्या 14 दिवसातील ऑनर किलींगच्या घटना
चंद्रपुरात अवैध सावकाराने कर्जदाराच्या मुलासह सुनेला पेट्रोल टाकून पेटवले : कर्जानं दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकारानं कर्जदाराच्या मुलाला आणि सुनेला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना आज चंद्रपुरात घडली
प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या, आई गजाआड : अनैतिक संबधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाची महिलेने प्रियकराच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दहा वर्षांच्या चिमुरड्याला कॅनॉलमध्ये ढकलून आरोपींनी त्याचा जीव घेतला.
प्रियकराच्या मदतीने भावी पत्नीकडूनच नवरदेवाचा खून, भंडाऱ्यातील हत्येचा उलगडा : भंडाऱ्यातील एका तरुणाची लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या करुन त्याचा मृतदेह जंगलात फेकला होता. या हत्येचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 48 तासात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह : नागपुरात अवघ्या दोन दिवसांत तीन हत्या झाल्याचं समोर आलं आहे. नागपुरात गुन्हेगारांच्या टोळ्यांमधीस संघर्षात प्रतिस्पर्धी गुंडांची हत्या झाली आहे.
अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवलं : अहमदनगरमध्ये 'सैराट' चित्रपटातील कथेची पुनरावृत्ती झाली आहे. आंतरजातीय विवाह केल्याने, मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अहमदनगर कथित ऑनर किलिंग घटनेला नवे वळण, मुलीला घरच्यांनी जाळलं नसल्याचं निष्पन्न : अहमदनगरमधील पारनेरच्या निघोजमध्ये घडलेल्या कथित ऑनर किलिंग प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगळाच दाव करुन लोकांना गोंधळात टाकले आहे.
अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू, अत्याचार करुन खून झाल्याचा संशय : एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरातील नागभीड तालुक्यातील पारडी (ठवरे) गावात घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
संबधित बातम्या
अंत्यविधीदरम्यान मानवंदना देण्यासाठी झाडलेल्या गोळीने वृद्धाचा मृत्यू
घरगुती वादातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विवाहितेने स्वतःला पेटवून घेतले, डॉक्टर पती भाजला
बारामतीत जन्मदात्या आईने डोक्यात दगड घालून मुलीला ठार केलं, 14 दिवसात राज्यातली ऑनर किलींगची सातवी घटना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2019 03:35 PM (IST)
ऋतुजाचा पती नांदवत नसल्याने मुलीची आणि तिच्या आईची घरी रोज वाद होत होते. मुलीने नांदावे यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींबरोबर चर्चाही केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -