कोल्हापूर : कोल्हापूर शहरात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी होत असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन मुलींची सुटका करण्यात आली. यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. या तस्करीमध्ये सहभागी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


कोल्हापूरच्या हनुमाननगर परिसरात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकत दोन मुलींची सुटका केली, तर एका महिलेसह तीन पुरुषांना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास कोल्हापूर पोलिसांनी सुरु केला आहे.

कोल्हापूरमध्ये पोलिसांनी केलेल्या या कारवाईत इंडियन रेस्क्यू मिशन संस्थेनं पोलिसांना सहकार्य केलं आहे. घटनास्थळावरुन शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत.