कोल्हापूर : तुम्ही जर पुणे-बंगळुरु महामार्गाने प्रवास करत असाल, तर सावध रहा. या महामार्गावरील कोल्हापूर हद्दीत चतुर महिलांकडून दररोज अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने ही लूट केली जाते.
हायवेवर लिफ्टच्या मागणारी लुटारु महिलांची टोळी कार्यरत झाली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गाची सर्वात फास्ट अशी ओळख असली, तरी कोल्हापूर हद्दीत मात्र जरा वेगळी ओळख आहे.
या भागात सध्या लिफ्टच्या बहाण्याने आलिशान गाडी मालकांना लुटणाऱ्या महिलांच्या टोळीची दहशत वाढली आहे.
त्यांची 'लुटण्याची कला'ही जरा वेगळीच आहे. टोळीतील एक महिला हायवेवर नटून उभी राहते. त्यानंतर एक आलिशान गाडी हेरली जाते. लिफ्ट मिळाल्यावर धन्यवाद करण्याच्या बहाण्याने गाडी मालकाचा नंबर मिळवायचा.
एकदा का नंबर मिळाला की मग मैत्रीसाठी आपणहून फोन करायचा. त्याला भेटण्यासाठी बोलवायचं. वेगवेगळी आमिषं दाखवायची. गाडीमालक आपल्या जाळ्यात अडकला, हे समजताच त्याला ब्लॅकमेल करायचं. त्यांचं टॉर्चर इकतं असतं की पीडित गाडी मालकांचं जगणंही मुश्किल झालं आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये या महिलांनी अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. बदनामीच्या भीतीने तक्रार न करणाऱ्या पीडित कारचालकांना आपणहून समोर येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
या लुटारु महिलांमुळे खरोखर अडचणीत असणाऱ्या महिलांची गैरसोय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र कोल्हापुरातून जर या हायवेवर पोहचलात तर सावध राहा.
पुणे-बंगळुरु हायवेवर लिफ्टच्या बहाण्याने महिलांकडून लूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Dec 2018 06:57 PM (IST)
टोळीतील एक महिला हायवेवर नटून उभी राहते. त्यानंतर एक आलिशान गाडी हेरली जाते. लिफ्ट मिळाल्यावर धन्यवाद करण्याच्या बहाण्याने गाडी मालकाचा नंबर मिळवायचा. एकदा का नंबर मिळाला की मग मैत्रीसाठी आपणहून फोन करायचा...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -