मुंबई : राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 72 हजार पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांनी मंगळवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होणार असून पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार आहेत.

मेगाभरतीचे लाभ काय?

या नोकरीमध्ये नियमित शासकीय सेवेचे सर्व लाभ मिळणार आहेत. आधी मानधनावर पदं भरली जाणार होती, पण आता सरळ सेवा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पेन्शन योजनाही लागू होणार आहे.

पेन्शन योजनेसाठी पगारातून 10 टक्के कापले जाणार आणि तेवढेच पैसे सरकार टाकणार. हे पैसे बँक खात्यात जमा करुन त्याचं व्याज निवृत्तीनंतर दिलं जाणार. नव्या नोकरदारांना पीएफ आणि ग्रॅच्युईटीही मिळणार आहे, तर घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता नियमाप्रमाणे मिळणार आहे.

एकूण पदे भरली जाणार - 72 हजार

पहिल्या टप्प्यात - 36 हजार

दुसऱ्या टप्प्यात - 36 हजार

सध्या राज्यात 1 लाख 80 हजार पदं रिक्त आहेत

72 हजारांपैकी कोणत्या वर्गात किती पदे?

72 हजारांपैकी 5 हजार पदं क्लास 1 आणि क्लास 2 संवर्गातील आहेत

67 हजार पदं क्लास 3 आणि क्लास 4 संवर्गात भरली जातील

कोणत्या विभागात किती पदं असतील?  

1. ग्रामविकास विभाग - 11 हजार 5 पदे
2. सार्वजनिक आरोग्य विभाग - 10 हजार 568 पदे
3. गृह विभाग - 7 हजार 111 पदे
4. कृषी विभाग - 2 हजार 572 पदे
5. पशुसंवर्धन विभाग - 1 हजार 47 पदे
6. नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे
7. सार्वजनिक बांधकाम विभाग - 837 पदे
8. जलसंपदा विभाग - 827 पदे
9. जलसंधारण विभाग - 423 पदे
10. मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90 पदे​

संबंधित बातम्या

मेगाभरती होईपर्यंत वय उलटून जाणाऱ्यांचं काय?


मेगाभरती स्थगित केल्याने अनेकांचे नुकसान: अशोक चव्हाण


मेगाभरती स्थगित, नोव्हेंबरपर्यंत आरक्षण प्रक्रिया: मुख्यमंत्री


मेगाभरती होईपर्यंत वय उलटून जाणाऱ्यांचं काय?