पालघर : विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून एका कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शॉक लागल्यानंतर जवळपास तासभर त्या कर्मचाऱ्याचा मृतदेह खांब्यावर लटकत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बोईसर पूर्व येथील बेटेगाव जवळील महेंद्र कॉप्लेक्समध्ये ही घटना घडली. शुक्रवारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विकास देवसिंग नावाचा कर्मचाऱ्याची महेंद्र कॉम्प्लेक्समध्ये विद्युत खांबावर काम करत होता. मात्र, त्याचवेळी विद्युत तारेमध्ये रिवर्स करंट आला आणि काही कळण्याच्या आत विजेचा धक्का लागल्याने देवसिंग यांचा तारेवरच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, या घटनेनंतर जवळापास तासभर तो मृतदेह तारेवरच लटकलेल्या अवस्थेत होता. काही वेळानंतर करंट बंद करण्यात आला आणि मृतदेह खाली उतरण्यात आला.
सदर मृतदेह बोईसर येथील तुंगा रुग्णालयात शनविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सदर कामगार कंत्राटदाराकडे काम करत होता. मात्र, त्यावेळी कंत्राटदाराचा निष्काळजीपणा समोर आला आहे.